Friday, December 4, 2015

सम-विषम आणि सहिष्णुता..!!!

केजरीवालांच्या सम-विषम फॉर्मुल्यामुळे बाकी काही झाल नाही तरी सहिष्णुतेमधे वाढ नक्कीच होईल...!!

१) अक्षम बस व्यवस्थेचा वापर करणे अनिवार्य होईल आणि हळू हळू किमान बस आहे याची जाणीव होऊन व्यवस्थेवरचा राग कमी होईल.

२) त्रासदायक शेजारी किंवा कुरघोडी करू पहाणार्‍या सहकारी कर्मचार्‍या बरोबर जुळवून घेऊन ये जा करायला सुरुवात केल्यानंतर आपण समजतो इतके इतर लोक वाईट नसतात याची जाणीव होऊन धुसफुस कमी होईल.

३) रस्त्यावरील गर्दी कमी झाल्यामुळे ट्रॅफिक जॅम मधे अडकणे कमी होऊन, पर्यायाने चिडचिड कमी होईल.

४) प्रदूषण कमी झाल्यामुळे एलर्जीमुळे होणारी सर्दी कमी होऊन नाक हुळहुळणे थांबेल आणि आपोआपच स्वभाव आनंदी बनेल.

५) इतरांना होणार्‍या खोकल्यात घट झाल्यास ध्वनीप्रदूषण कमी होऊन त्यामुळे आपले डोके ठणकणे थांबेल.

अश्या रितीने राग, धुसफुस, चिडचिड, नाक हुळहुळणे आणि डोके ठणकणे थांबल्यामुळे आणि स्वभाव आनंदी झाल्यामुळे त्रास सहन करण्याची क्षमता वाढेल आणि आपण कोणावरही वसकन ओरडणार नाही.

कोणत्याही घटनेवर शांतपणे विचार करुन प्रतिक्रिया देणे यालाच म्हणतात सहिष्णुता..!!!

No comments: