मी आणि माझी पत्नी दोघेही डॉक्टर. स्वत:चे हॉस्पिटल गेली २५ वर्षे चालवतोय. गेले चार महिने आम्ही करोनाचा कडेकोट बंदोबस्त करूनच काम करतो, म्हणजेच आम्ही करोना घरी नेणार नाही याची पूर्ण काळजी घेतो; कारण घरात ८६ वर्षांचे वडिल आणि ८० वर्षांची आई. घरामधे स्वयपाकाच्या बाई, केरवाली बाई, धुण्याच्या बाई, वरकामाच्या बाई व ड्रायव्हर सगळ्यांना मास्क लावण्याबद्द्ल ताकीद दिलेली होतीच. आईला सक्त सूचना की घरात बाहेरील कोणीही आले तर स्वत: मास्क घालणे अत्याश्यक आहे, ते पाळलेच पाहिजे.
६ जुलैला आम्ही रुग्णालयातून परत आलो त्यावेळी माझी आई म्हणाली थोडे डोके दुखते, अंग दुखते. मी तिला क्रोसिन आणि पित्तासाठी औषध दिले आणि दुसर्या दिवशी तिला तिच्या डॉक्टरांकडे जायला सांगितले (मी बालरोग तज्ञ आणि पत्नी स्त्रीरोगतज्ञ, त्यामुळे माझी एक फिजिशियन मैत्रीण जी तिची विद्यार्थिनी होती, ती तिची डॉक्टर) . ७ जुलैला रक्ताची तपासणी करण्यासाठी नमुना घेतला आणि संध्याकाळची वेळ घ्यायला सांगितली. रिपोर्ट येई पर्यंत तिचे दुखणे राहिले होते, आणि रिपोर्ट मधे फार काही दोष नव्हता म्हणून ती काही डॉक्टरांकडे गेली नाही. पण १२ तारखेला ती अशक्तपणा जाणवतो म्हणाली म्हणून १३ तारखेला परत रक्ताचे नमुने घेतले आणि तिला डॉक्टरांची वेळ घ्यायला सांगितली.पण विशेष काही झालेले नाही म्हणून तिने डॉक्टरांकडे जायचे टाळले.
१५ तारखेला रात्री १०.३० ला तिच्या पोटात दुखू लागले, म्हणून मी तिला एक इंजेक्शन दिले आणि मूतखड्याची आधीची घटना आठवल्याने सकाळी सोनोग्राफी करायला गेलो, तिथे तिच्या पित्ताशयात खडे आहेत आणि कदाचित पित्तनलिकेत एक खडा अडकला असावा म्हणून सीटी स्कॅन करावा लागेल असे ठरले. माझा मित्र, जो फिजिशियन आहे त्याच्या कडे गेलो आणि काय करावे अशी चर्चा केली तर तो म्हणाला की आता पित्ताशयाच्या खड्याचे ऑपरेशन करायचे झाले तर कोव्हिड टेस्ट करावीच लागेल, आणि पोटाचा सिटी स्कॅन करायचा, तर तेंव्हाच छातीचा ही करू म्हणजे करोनाच्या शंकेबद्दल निर्णय करता येईल.
तिला घेऊन दिनानाथ हॉस्पिटल मध्ये सीटी स्कॅन करायला गेलो. त्या मधे पित्ताशयात खडे आहेत, पित्तनलिकेत खडा नाही पण छातीत करोनाची लक्षणे आहेत असा रिपोर्ट कळल्यावर माझ्या पायातले त्राणच नाहीसे झाले. या दरम्यान दोन्ही भावांना फोन वर सतत माहिती देत होतोच आणि त्यांनी रुग्णालयात येऊ नये म्हणून सांगत होतो, कारण इमर्जन्सी वॉर्ड मधली परिस्थिती भितीदायक होती, आणि मलाही इमर्जन्सी वॉर्डात थांबू देत नव्हते. बाहेर रुग्ण जागेसाठी भांडत होते शेवटी करोना सस्पेक्ट म्हणून दाखल करायचे ठरले आणि फक्त जनरल वॉर्ड उपलब्ध असल्यामुळे तिला तिथे दाखल केले व स्पेशल रुम ला नंबर लावण्यासाठी आगाऊ रक्कम भरून ठेवली.
आईला घेऊन ४ब वॉर्डपर्यंत गेलो असता, आता तुम्हाला पेशंटला भेटता येणार नाही, त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल असे तेथील सिस्टरने सांगीतले तेंव्हा माझ्या पायाखालील जमीनच सरकली असे वाटले. ताबडतोब मी डॉक्टर मित्राला जाऊन भेटलो आणि काहीतरी करून स्पेशल रुमचे बघ असे सांगितले तर तो म्हणाला स्पेशल रुम मधे सुध्दा तुला सोडणारच नाहीत, तिथे पेशंट एकटीच राहील त्यापेक्षा जनरल वॉर्डात राहूदे, नर्सेसचे जास्त लक्ष राहील, स्पेशल रुम चा हट्ट करु नको. आपण डॉक्टर असून आई जनरल वॉर्डात कशी असा अहंकार सोड, तसेच माझ्याच युनिटमधील एक सहकारी सध्या कोव्हिड ड्यूटीवर आहे, तो तुझ्या आईला हा आठवडा बघेल, पुढच्या आठवड्यात माझी ड्युटी आहे, आम्ही तुझ्या आईची नीट काळजी घेऊ.
निमूट पणे आईला फोन करुन सर्व सांगितले आणि घरी जाऊन वडिलांना नीट समजाऊन सांगितले. माझ्या पत्नीला - मानसीला माझ्या मनात काय चालले आहे याचा अंदाज येऊन तिच्याच डोळयातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपल्या आईला रुग्णालयात एकटे सोडून देणे फारच भितीदायक होते. तसे मी माझ्या सर्व मित्रांना कळवले. सगळ्यांनी काळजी करु नको, आम्ही लक्ष ठेऊ असे सांगितल्याने जीव थोडा भांड्यात पडला हे नमूद करणे अत्यावश्यक आहे. रात्री १० वाजता स्पेशल रूम उपलब्ध झाली आहे, रुग्णाला तिकडे नेत आहे असा दिनानाथ मधून फोन आला, मी त्यांना जनरल वॉर्डातच ठेवा असे सांगीतले.
१७ जुलै : करोना अॅंटीजेन टेस्ट निगेटिव्ह पण ऑक्सिजन द्यायची गरज निर्माण झाली त्यामुळे ऑक्सिजन वॉर्डात हलवले. फुफ्फुसात सूज दर्शवणार्या आय एल सिक्स चाचणीचे प्रमाण ५६ म्हणजे खूप जास्त. डॉक्टरांनी ऑक्सिजन खूप म्हणजेच ८ लिटर लागत आहे, एखादे वेळेस पॉझिटिव्ह प्रेशर किंवा व्हेंटीलेटर लागू शकेल अशी कल्पना देऊन ठेवली. मी तुम्हाला वाटेल ते योग्य उपचार करा, कधी थांबायचे ते तुम्हीच ठरवा असे सांगीतले, त्यांनी माझी पत्नी व वडिलांची कोव्हिड टेस्ट करायला सांगितले. इतर अनेकांनी विरोधी मत दिले तरीही मी लगेच भारती हॉस्पिटल मधील मित्राला फोन करून दुसर्या दिवशीची वेळ घेतली.
१८ जुलै : पहाटे आईची कोव्हिड टेस्ट (RTPCR) पाठवली गेली. आम्हीही आमचे स्वॅब टेस्ट साठी सॅंपल दिले. आमच्या दोघांपैकी कोणाचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली असती तर वडिलांचे काय करायचे? आमच्या हॉस्पिटल मधील स्टाफ च्या टेस्ट करायच्या का? रुग्णालय बंद करायचे का? पेशंट्स चे काय करायचे? स्टाफने काय करायचे? अनेक प्रश्न..!! संध्याकाळी तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह, पण आई पॉझिटिव्ह. ऑक्सिजन ची गरज १० लिटर पर्यंत वाढली होती, पण पोट दुखणे ५०% कमी. संध्याकाळी अगदी जवळचा मित्र आणि त्याची पत्नी भेटायला आले आणि त्यांनी घेतलेल्या पंचगव्ययुक्त आयुर्वेदिक औषधाबद्दल सांगीतले. . त्या डॉक्टरांचा फोन नंबर दिला. मी त्यांना माझ्या आईबद्दल सांगितले. त्यांनी दुसर्या दिवशी औषध घेऊन जायला सांगितले.
१९ जुलै : आईला पंचगव्याचे आयुवेदिक औषध घेशील का असे विचारले. ती म्हणाली तिचे वडिल (जे कोकणात वैद्य होते) पंचगव्याचे औषध रुग्णांना देत असत. मग तिला म्हणालो की औषध पाठवतो, बाबांनी दिले असे समजून घे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या जवळ राहणार्या माझ्या भावाला ते औषध आणून आईकडे पोचवायला सांगीतले. ते मिळेपर्यंते हृदय रोग तज्ञांनी हृदयाच्या डाव्या बाजूवर ताण येत असल्याने एखादेवेळेस फुफ्फुसात रक्ताची गुठळी अडकली असेल म्हणून सीटी अॅँजिओग्राफी करायचा सल्ला दिला. आईने आयुर्वेदिक औषधाचा डोस सकाळी व रात्री घेतला.
२० जुलै : सोमवार पासून माझ्या मित्राची कोव्हिड वॉर्डात ड्युटी. छातीत रक्ताची गुठळी नाही. रक्ताच्या तपासणीसाठी रक्त पाठवले गेले. घरातील कर्मचार्यांची स्वाब टेस्ट भारती हॉस्पिटल मधे केली. आईची ऑक्सिजन ची गरज कमी झाली, पण २ लिटर लागतच होता. पोट दुखायचे मात्र राहिले. स्वैपाकाच्या बाई पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. या बाई नेहमीच्या स्वैपाकाच्या बाईंच्या ऐवजी बदली म्हणून १३ तारखेपासून यायला लागल्या होत्या.
२१ जुलै : ऑक्सिजन २ लिटर वर, तब्येत उत्तम. करोनासाठीच्या जास्तीच्या अँटीबायोटिक्सची गरज नाही असा निर्णय तेथील संसर्गतज्ञ डॉक्टरांनी घेतला. एका मित्राने माझ्या रुग्णालयातील सर्व स्टाफ, आम्ही तिघे, माझ्या भावांच्या घरांतील सर्व आणि आई साठी होमिओपाथी गोळ्या पाठवल्या. त्या सर्वांपर्यंत पोचवल्या.
२२ जुलै : रक्ताच्या तपासण्या परत पाठवल्या गेल्या. बाकी परिस्थिती जैसे थे.
२३ जुलै : रक्ताच्या तपासण्यांचे रिपोर्ट चांगले, आवाजात जाणवण्याइतकी सुधारणा. दिनानाथ रुग्णालयातून फोन की भरलेल्या अॅडव्हान्स पेक्षा बिल जास्त झाले आहे, कृपया अॅडव्हान्स भरा. उद्या भरतो असे सांगितले.
२४ जुलै : अन्न घशाखाली उतरत नाही अशी तक्रार. त्यासाठी औषधयोजनेत बदल केला गेला. पण ऑक्सिजनची पातळी थोडा वेळ खाली गेली व परत वर आली.
उद्या नागपंचमी, आईचा तिथीने वाढदिवस. रात्री मानसीने घरी केक केला व तो दुसर्या दिवशी वॉर्डातील सर्व रुग्ण आणि स्टाफला देण्यासाठी दोन बॉक्सेस मधे पॅक केला..!!
२५ जुलै : सकाळी लवकर दोन्ही बॉक्सेस दिनानाथला पोचवले. ऑक्सिजन पातळी वर खाली होत असल्याचे सिस्टर ने सांगीतले. संध्याकाळी माझ्या मित्राने सुध्दा थोडी काळजी व्यक्त केली. न्युमोनिया तर नसेल ना अशी मी शंका व्यक्त केली पण त्याच्या मते तशी कोणतीच लक्षणे नव्हती. रात्री जेवताना मला आठवले की पूर्वी क्वचितच आईला सीरोप्लोचा पफ घ्यायला लागायचा. म्हणजे कधी कधी तिच्या खोकण्याचा आवाजाने मला रात्री जाग आली की मी तिला पफ घे म्हणून सांगायचो आणि मग तिचा खोकला थांबायचा. मग मी मित्राला फोन केला की दम्यासारखी स्थिती नसेल ना? तर तो म्हणाला की पफ देऊन बघू. आईला विचारले की पफ बरोबर नेला आहे का? ती म्हणाली घरीच कपाटात आहे. रात्री १०:३० ला पफ नेऊन दिला.
२६ जुलै : सकाळीच आईचा फोन आला, की पफ घेतल्यामुळे खूप बरे आहे. ऑक्सिजन पातळी सुधारली. संध्याकाळी मित्राचा फोन आला की खूपच सुधारणा आहे. ऑक्सिजन चालू ठेऊन घरी पाठवता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखादा आठवडा घरी ऑक्सिजन द्यावा लागेल. १६ तारखेला केलेल्या सीटी स्कॅन मधे आजार झाल्यापासून ६-७ दिवसांनतर दिसणारी लक्षणे असल्यामुळे ९-१० तारखेला संसर्ग झाला असावा असे मानून २७ तारखेला १७ दिवस पूर्ण होतील आणि आईमुळे कोणाला संसर्ग होणार नाही. त्यामुळे तसेच रुग्णालयात राहिल्याने होऊ शकणार्या इतर संसर्गाचा त्रास होऊ नये म्हणून लवकर घरी गेलेले बरे. निर्णय घेऊन कळव म्हणजे डिस्चार्ज़ करु..!!
२७ जुलै : आजपासून माझ्या मित्राची ड्युटी संपली पण माझ्या अजून एका परिचित डॉक्टरांची आणि आईच्या एका विध्यार्थिनीची कोव्हिड वॉर्डात ड्यूटी. सकाळीच आईचा फोन की त्यांनी ऑक्सिजन १ लिटर वर कमी केला आहे. रात्री त्या डॉक्टरांनी मला फोन करुन सांगितले की उद्या ऑक्सिजन बंद करु आणि त्रास झाला नाही तर लवकर सोडू. डिस्चार्ज होईल बहुतेक असे लक्षात आल्यावर घरी ऑक्सिजन लागल्यास हॉस्पिटल मधील सिलेंडर नेता येण्यायोग्य जुळवणी केली. तसेच भाड्याच्या कॉन्सेन्ट्रेटरची चौकशी केली. महिना ३५०० ला मिळणारे मशीन आता ७००० ला मिळत आहे, नवीन घ्यायचा तर पूर्वी ३०००० ला मिळणारे आता ५००००, ६०००० ला मिळते. कोव्हिड मुळे भरपूर भाववाढ झालेली दिसते.
२८ जुलै : ऑक्सिजन बंद केला. आईच्या विद्यार्थिनीने मला फोन करून सांगीतले की ३-४ तास काहीही त्रास झालेला नाही. तब्येत उत्तम आहे. भावांशी चर्चा करून डिस्चार्ज मिळाल्यास दिनानाथ जवळच राहणार्या भावाच्या घरी ठेवायचे ठरवले, म्हणजे परत पोट दुखायला लागल्यास ताबडतोब नेऊन शस्त्रक्रिया करता येईल. त्याच्या एका मित्राच्या घरी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर होता, तो त्याने घरी आणून ठेवला.
२९ जुलै : १२ वाजता डॉक्टरांचा फोन की तब्येत उत्तम आहे, ऑक्सिजन ची गरज नाही, थोड्याफार चालत आहेत, व्यायाम करु शकतात, डिस्चार्ज करतो..!! डिस्चार्ज प्रक्रिया २.४५ वाजता पूर्ण झाली व मी उर्वरित बिल भरले. दिनानाथने सिनियर सिटिझन म्हणून स्वत:च सूट दिली. मला तरी बिलामधे कोठेही जास्त रक्कम लावल्यासारखी वाटली नाही. ४ वाजता आईला व्हील चेअर वरुन खाली आणले व आम्ही तिला भावाच्या घरी घेऊन गेलो.
डॉक्टर मित्रांच्या सहाय्याने आईने करोना बरोबरची लढाई तर जिंकली. आता प्रश्न राहिला तिला संसर्ग कोठून झाला ? १३ तारखेला कामाला सुरुवात केलेल्या पोळ्यांच्या बाई मुळे म्हणावे तर १६ तारखेचे सीटी स्कॅन मधील बदल ६-७ दिवसांचा आजार दाखवत होते, म्हणजे ९-१० तारखांचा संसर्ग. आमच्या रुग्णालयातील एखाद्या रुग्णाने आम्हाला संसर्ग दिला, आणि तो आम्ही घरी आणला का? पण मग आमच्या चाचण्यांमधे तो का सापडला नाही? ह्या विषाणूच्या संसर्गाचा उगम समजत नाही म्हणजेच आईला तो हवेतून झाला असणार, आणि सरकार म्हणते कम्युनिटी संसर्ग नाही. खरे खोटे देवालाच ठाऊक..!!
आई वडिलांची इतकी आजारपणे झाली, पण एवढ्या वर्षांमधे एवढी अगतिकता कधीही जाणवली नव्हती. याचे कारण पूर्वी शत्रू माहीत असायचा आणि त्याच्याशी लढण्यास मित्र खंबीर असायचे. आता मित्र खंबीर असले तरी शत्रूचे आकलन नीट झाले नव्हते. सर्दी नाही, ताप नाही, खोकला नाही, पोटदुखीचे वर्णन आजारात कोठेही नाही. केवळ सीटी स्कॅन केल्यामुळे संशय येऊन पुढील उपचार केल्याने जिवावर आलेले दुखणे टळले. ज्या आजारासाठी एलोपथीमधे औषधच नाही, असा आजार ८० वर्षाच्या आईला झाल्याने, मी भांबावलो होतो आणि अगतिक झालो होतो हे १००% सत्य आहे.
आयुर्वेदिक, होमिओपाथिक, कोणत्याही औषधाने बरे झाले तरी मला चालणार होते, कारण मी काही एलोपथीचा शोध लावलेला नाही, आणि इतर शास्त्रांशी माझे वैर नाही. मी स्वत: गेली पंचवीस वर्षे बध्द्दकोष्ठ्तेसाठी पवनमुक्तासन करतो आणि एलर्जिक सायनुसायटिस साठी जलनेती करतो, त्यामुळे इंटिग्रेटिव्ह मेडिसिन बद्दल मला थोडा जास्तच जिव्हाळा आहे. एलोपथिक निदान आणि जगायला आधार देणार्या एलोपथिक उपचारांच्या जोडीला आयुर्वेदिक आणि होमिओपाथिक उपचारांनी माझी आई बरी झाली असे मी समजतो.
संसर्गजन्य आजाराची साथ असेल तेंव्हा कोणतीही लक्षणे असली तरी साथीचा आजार नाही ना याचा विचार करायला हवा हे अत्यंत महत्वाचे तत्व माझ्याच आईच्या बाबतीत मी कसे विसरलो हा यक्षप्रश्न आहे. इतर रुग्णांवर उपचार करता करता आपण आपल्या नातेवाईकांचा जीव धोक्यात घालत आहोत का अशी सारखी शंका वाटते. अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्याची १०० छकले होऊन ती माझ्याच पायाशी लोळत आहेत. मित्रांनी वेळोवेळी धीर दिला म्हणून मी अजूनही शिल्लक आहे..!! सर्व डॉक्टर्स आणि मित्रांबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करून ही करोना कहाणी संपवतो.
डॉ राजीव जोशी.

2 comments:
Well said.
खूप काही अनुभवले आणि ते वर्णन देखील खूप व्यवस्थित केले . कोविड किती अपरिचित आहे आणि जेव्हढी काळजी घेतली ती कमीच हे दाखवून दिले.
आम्ही काळजी घेतो, आयुर्वेदिक औषधे घेऊन immunity शाश्वत ठाण्याचा प्रयत्न करतो.
धन्यवाद!
Post a Comment